मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचव्यांदा समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने पाचव्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

अरविंद केजरीवाल यांना याआधी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी व 13 जानेवारी रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र या चारही तारखांना केजरीवाल ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत.

लोकसभा निवडणूकीआधी अटक करण्यासाठी समन्स

भाजपला मला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे मला अटक करण्याचा कट रचला जात आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.