मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम नवी मुंबई, मात्र मुंबई न सोडण्याचा ठाम निर्धार

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा सरकारने उपस्थित केला आहे. मात्र याबाबतचा अध्यादेश काढलेला नाही. या अध्यादेशाची वाट पाहत आजचा मुक्काम आम्ही नवी मुंबईतच करू, उद्या बारा वाजेपर्यंत वाट पाहू, नाहीतर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला दिला.

मराठा आंदोलक नवी मुंबईत पोहोचल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयाची त्यांना माहिती दिली. आत्तापर्यंत 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आढळून आले आहे. त्यापैकी 37 लाख मराठा बांधवांना ओबीसीच्या प्रमाणपत्राची वितरणही करण्यात आले आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचाही उल्लेख शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. मात्र याच उल्लेखाचा धागा पकडून जरांगे यांनी आज वाशी येथील शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत सगेसोयऱ्यांचा उल्लेख असल्याचा अध्यादेश शासनाने तातडीने काढावा अशी मागणी केली. हा अध्यादेश आज रात्री काढला तर उद्या आपण आझाद मैदानात गुलाल उधळण्यासाठी जाणार आहे. या अध्यादेशाची उद्या दुपारी बारापर्यंत वाट पाहू आणि त्यानंतर मात्र आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

माझे उपोषण सकाळी 11 पासून सुरू

प्रजासत्ताक दिनाचा मान राखून मराठा आंदोलन आज आझाद मैदानात जाणार नाहीत आजचा मुक्काम वाशी मध्येच होणार आहे. माझे उपोषण मात्र सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

नवी मुंबईत भगवे वादळ

मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील नवी मुंबई डेरे दाखल झाल्यानंतर संपूर्ण शहरात भगवे वादळ उचलले. रायगड जिल्ह्यातील अनेक आंदोलन आज लोकल ट्रेन ने नवी मुंबईत आले. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानक एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय आधी घोषणा होऊन गेले.