हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुंबईसह राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वर्सोवा विधानसभेतील शिवसेना शाखा क्र. 60 च्या वतीने शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करून विभागातील 100 नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्मान कार्ड उपविभागप्रमुख राजेश शेटये यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शाखा संघटक अश्विनी खानविलकर, संजना हरळीकर, कार्यालय प्रमुख नीलेश देवकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी विमानतळ विभागातील विविध नामांकित पंपन्यांच्या व्यवस्थापनाचे सदस्य आणि कामगार मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. या वेळी मियाल व्यवस्थापनाचे राजेश म्हात्रे, ओ.सी.एस. व्यवस्थापनाचे अविनाश अभ्यंकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, सहचिटणीस मिलिंद तावडे, विजय शिर्पे, बाबा शिर्पे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी केले होते.
शिवसेना भवनमधील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या पदाधिकाऱयांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर आणि सोनम जामसुतकर यांच्या वतीने माझगाव-ताडवाडी म्युनिसिपल स्कूल व वाडीबंदर, नवाब टँक, माझगाव उर्दू-मुंबई पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. शाखाप्रमुख सुहास भोसले, निंगाप्पा चलवादी, विद्या राबडिया, प्रमोद लाड, गोपीचंद कदम, बाळा गोलतकर, दीपक ठाकूर, अनिल पाटील, नथुराम नाकती, जनार्दन पाटील, लहू शेडगे, विश्वास कडवे आदी उपस्थित होते.
लोअर परळ येथील हॉटेल सेंट रेजीस येथे भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे यांनी हॉटेल युनियनच्या सदस्यांसोबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
भव्य चित्रकला स्पर्धा
शाखा क्रमांक 220 चे शाखाप्रमुख वैभव मयेकर यांच्या वतीने गिरगावमधील तिसरा पुंभारवाडा येथे शुक्रवार, 26 जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुर्गादेवी उद्यानात दुपारी 3 ते 5 या वेळेत होणाऱया या स्पर्धेत तीन गटांत स्पर्धा होणार आहे. पहिली ते चौथी पहिला गट, 5 ते 7 वी दुसरा गट तर 8 ते 10 असा तिसरा गट आहे. अधिक माहितीसाठी शाखेत संपर्क साधावा.
रक्तदान शिबीर
शिवसेना शाखा क्रमांक 20 पुरस्कृत धर्मवीर मित्र मंडळ यांच्या वतीने रविवार, 28 जानेवारीला सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभागप्रमुख, मंडळाचे अध्यक्ष अनंत नागम आणि शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी केले आहे.
मोफत चष्मा वाटप
स्वराज्य युथ पह्रमचे अध्यक्ष चेतन कोरगावकर यांनी मनराज प्रतिष्ठानच्या सहकार्याने कुर्ला पश्चिम येथील पटेल मेहता इमारत परिसरात मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन कुर्ला कालिना विधानसभेचे शिवसेनेचे विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 570 गरजूंच्या थायरॉईड, मधुमेह, ब्लड प्रेशर आदी आजारांच्या चाचण्या करून मोफत औषधे दिली. तसेच 511 जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी नितेश राजहंस सिंह, माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर, प्रविणा मोरजकर, विनोद साडविलकर, नदीम मलिक, रूपेश पवार, दीपू सिंह, वेंकट बोद्दुल, प्रकाश चौधरी, अजय शुक्ला उपस्थित होते. या शिबिरासाठी सायली कोरगावकर, महेश पटेल, नीलेश झंजे, प्रकाश उषागामा, फहीम शेख, रूपेश मोरे, अक्षय निकम, संदीप जायसवाल, डेव्हिड डायस, सिद्धेश्वर भानुशाली, हर्ष जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.