आदित्य ठाकरे यांचा झंझावात उद्या पिंपरी चिंचवड – पुण्यात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे रविवारी पिंपरी चिंचवड- पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. एक दिवसाच्या या दौऱ्यात आदित्य ठाकरे तळेगाव-दाभाडे व पिंपरी चिचवड येथे दोन सभा घेणार आहेत.

सकाळी 11 वाजता लोणावळा नगरपालिका नगरसेवकांसोबत आदित्य ठाकरे यांची बैठक होणार असून त्यानंतर तेथील व्यायामशाळेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपालिका चौक येथे स्वागत सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी चिंचवड कॉलनी येथे महानिष्ठा सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजता स्वारगेट येथील बाबुराव सणस मैदानात युवासेनेच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत.