श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या जावेद घडयाळ चव्हाण (30) याने दारूच्या नशेत आपल्या पित्याचा व भावाचा चाकूने भोसकून खून केला. पोलिसांनी जावेदला अटक केली असून त्याच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी समाज्यातील घडयाळ हिरामण चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा मुलगा जावेद याने दौंड तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने अनेकांना लुटले होतके. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल होते. पण पैशांवरून घरात कायम वाद व्हायचे. घरातील वादामुळे घड्याळ जावेद याची पत्नी त्याच्यासोबत नांदत नव्हती. शुक्रवारी जावेद दारू पिऊन घऱी आला व त्याने पत्नीला आणण्यासाठी पैसे हवे असल्याचे वडिलांना सांगितले. मात्र वडिल पैसे देत नसल्याने त्यांच्यात वादावादी सुरू झाली. भाऊ महावीर घड्याळ चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर जावेद याने याने त्याच्या जवळील चाकू महावीर याच्या पोटात खुपसला. मुलाला वाचविण्यासाठी पिता घड्याळ हिरामण चव्हाण गेले असता त्याांच्याही पोटात चाकू खुपसून दोघांचा खून करून तो पसार झाला.
याबाबात नगर गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अवघ्या काही तासातच जेरबंद केले. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टे शनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करीत आहेत.