ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना ‘कृ. पा. सामक’ जीवनगौरव

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या 2023 या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी मंत्रालयात करण्यात आली. ‘कृ. पा. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे.

उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी (मुद्रित) ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांची तर वाहिनीच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी विनया देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा सदस्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांना जाहीर झाला आहे. 6 जानेवारी रोजी असलेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा संघाचे उपाध्यक्ष महेश पवार आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, मंदार पारकर, सदस्य सचिव खंडूराज गायकवाड यांच्या निवड समितीने या पत्रकारांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस केली होती.