सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दहावीची तिबेट परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, दहावीची रिटेल परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती, ती आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 13 मार्चला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा मात्र 2 एप्रिलला संपणार आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी 10.30 ते दुपारी 1.50 या वेळेत सर्व दिवस परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक cbse.gov.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.