2022-23 या एका वर्षात 39 कॉर्पोरेट्स कंपन्यांकडून देण्यात आलेला निवडणूक फंड जाहीर करण्यात आला आहे. असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यात एकटय़ा भाजपला 70 टक्के फंड मिळाला आहे. भाजपला 250 कोटींहून जास्त निधी मिळाला असून तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीला 25 टक्के फंड मिळाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
एडीआरच्या रिपोर्टनुसार, 34 कॉर्पोरेट्स कंपन्यांनी निवडणुकीसाठी 360 कोटींहून जास्त रुपये खर्च केले आहेत. एका कॉर्पोरेट्सने समाज इलेक्टोरल ट्रस्टसाठी 2 कोटी रुपये खर्च केले. 2 कंपन्यांनी परिवर्तन इलेक्टोरल ट्रस्टसाठी 75.5 लाख रुपये दिले, तर 2 कंपन्यांनी ट्रंफ इलेक्टोरल ट्रस्टसाठी 50 लाख रुपये दिले. एडीआरने जो डेटा शेअर केला त्यानुसार भाजपला 259.08 कोटी म्हणजेच जवळपास 70 टक्के निधी मिळाली आहे, तर भारत राष्ट्र समितीला 25 टक्के म्हणजेच 90 कोटी रुपयांचा फंड मिळाला आहे.