राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून बैठकांना हजेरी लावणारे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना मटण-चिकन बिर्याणीपासून रसमलाईसारख्या स्वीट डिशवर ताव मारता येणार आहे. त्याशिवाय चहा, चमचमीत बटाटावडा, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा दिमतीला असेल. पण या खानपान सेवेवर दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. देवगिरी बंगल्याला खानपान सेवा पुरवण्यासाठी छत्रधारी कॅटररची नियुक्ती झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दोन वर्षे खानपान सेवा पुरवण्यासाठी छत्रधारी कॅटरर या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिल 2025पर्यंत हे कंत्राट देण्यात आले आहे.