अजमेर दर्ग्याजवळ 4 मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर दर्ग्याजवळ एक 4 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर्ग्याच्या प्रवेशद्वार 5 जवळ ही घटना घडली आहे.

सोमवारी दुपारी अचनाक ही इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पथकानी बचावकार्याला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध दर्ग्याजवळ ही घटना घडल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. तसेच परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे.