क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतकणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने साताऱयातील एका डॉक्टरसह पाचजणांची तब्बल 24 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांकर गुन्हा दाखल झाला आहे.
मयंक दुडेजा उर्फ मयंक कुमार, किकास दुडेजा (रा. हरियाणा, पंजाब), जितेंद्र शर्मा (रा. पलक, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाके आहेत.
किरणराज श्रीरंग शिंदे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) हे डॉक्टर आहेत. त्यांची संशयितांसोबत झूम मिटिंगच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीतून संशयितांनी त्यांना क्रिप्टो करन्सी ऍपजेट टोकन कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला 10 टक्के परतावा दिला जाईल, असे आमिष दाखविले.
त्यानंतर डॉ. शिंदे यांनी पाच लाख रुपये त्यामध्ये गुंतवले. पुढील तीन महिने दीड लाख परतावा मिळाला. त्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही. शिंदे यांची तीन लाख 50 हजारांची फसवणूक झाली. त्यांच्याप्रमाणेच दादासो तानाजी भोसले यांचे 5 लाख 84 हजार, संतोष भानुदास भोसले यांचे 7 लाख 90 हजार, नीलेश राऊत यांचे आठ लाख, नंदकुमार जाधव यांचे पाच लाख संशयितांच्या कंपनीमध्ये गुंतकले. मात्र, त्यांनाही परतावा नक्हे तर त्यांची मुद्दलही मिळाली नाही. हा प्रकार जुलै 2022 ते 30 डिसेंबर या कालावधीत घडला. आपली फसकणूक झाल्याचे निदर्शनास येताच डॉ. शिंदे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाक घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक साबळे तपास करीत आहेत.