पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या वाराणसीतील भाजप आयटी सेलच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन आरोपींपैकी एक आरोपी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत होता.
मिळालेल्या माहितीनूसार, कुणाल पांडे, आनंद ऊर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल हे तीन नराधम भाजप आयटी सेलचे पदाधीकारी आहेत. मोदी, नड्डा आणि स्मृती इराणींसोबत या नराधमांचे काही फोटो काँग्रेसने शेअर केले आहेत. आयआयटी बीएचयूमध्ये (IIT-BHU) मॅथेमेटिकल इंजिनीअरिंग विभागात बिटेक करणाऱ्या विद्यार्नीवर 1 नोव्हेंबर रोजी कुणाल पांडे, अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल या नराधमांनी बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर विवस्त्र करून आळीपाळीने बलात्कर केला आणि यांच्यातल्या एकाने घटनेचा व्हिडीओ रोकॉर्ड केला होता.
घटना घडल्यानंतर 60 दिवसांनी या नराधमांना अटक करण्यात आली. सध्या त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी सतत ठिकाणं बदलत असल्यामुळे पोलिसांना तपास करताना अडचणी आल्या होत्या. अटक होण्यापुर्वी आरोपी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत गेले आणि त्यानंतर राजधानी लखनऊला पोहोचले. दरम्यान, पोलिसांनी या 60 दिवसांच्या कालावधीत त्यांचे मोबाईल नंबर ट्रेस करून त्यांच्यावर पाळत ठेवली होती.
60 दिवसांनी घरी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले
60 दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आपल्याला आता पोलीस अटक करणार नाहीत, असे आरोपींना वाटले होते. त्यामुळे ते न घाबरता पुन्हा आपल्या मुळ घरी परतले. पोलिसांनी साफळा रचला होता. त्यामुळे आरोपी घरी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
कोण आहेत हे आरोपी?
कुणाल पांडे या आरोपीचे दोन वर्षांपुर्वी लग्न झाले असून त्याचे सासरे नगरसेवक आहेत. त्यामुळे तो सुद्धा नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत होता. तसेच, घटनेच्या दिवशी वापरलेली बुलेट कुणाल पांडेची असल्याचे तपासात उघडं झाले आहे.
दुसरा आरोपी सक्षम पटेल हा कौरिया हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर आहे. त्याच्या कुटुंबीयांचा फळांचा व्यावसाय आहे. त्याच्या घरी आमदारांपासून ते सत्ताधारी पक्षातील लोकांची ये-जा सुरु असल्याचे बोलले जात आहे. तो सुद्धा कही दिवसांपासून एका बड्या स्थानिक नेत्याच्या संपर्कात होता.
तिसरा आरोपी आनंद ऊर्फ अभिषेक चौहान याच्यावर यापुर्वी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचे वडिल साडी प्रिंटिंगचे काम करतात आणि अभिषेक हा 12वी चे शिक्षण घेत आहे.
सध्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल असून पुढील चौकशी सुरू आहे. चौकशीत अनेक खूलासे होण्याची शक्यता आहे.