राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला; पंजाबमधील अमृतसरमध्ये होणार समाजाच्या प्रश्नांवर मंथन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट रद्द करा यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल. समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत.

अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब विधानसभेचे उपसभापती जय क्रिष्ण सिंग, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातील ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, गोव्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, क्रिकेटपटू तथा राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान, वर्ध्याचे खासदार अमर काळे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार डॉ. शोभा बच्चाव, खासदार संजय देशमुख, खासदार बाळू मामा म्हात्रे, तेलंगानाचे खासदार इटेला राजेंदर, तेलंगानाचे सदस्य रविचंद्र वड्डीराजू, तेलंगानाचे खासदार सुरेश शेटकर, पंजाबमधील ‘आप’चे आमदार संतोष कटारिया, पंजाबमधील ‘आप’चे आमदार तरणप्रित सिंग सोंड, हरयाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, माजी मंत्री महादेवराव जानकर, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, सेवानिवृत्त अधिकारी अशोक बाथ यांची प्रमुख उपस्थित राहील.

या अधिवेशनात माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग हे उद्घाटन सत्राचे स्वागतपर भाषण करतील. अधिवेशनामागची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मांडतील. या दरम्यान मान्यवाराच्या हस्ते लढा संविधानिक हक्काचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे या नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षीय भाषण करतील.

दुपारी 3 वाजता होणाऱ्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी तेलंगाना आणि आंध्र प्रदेश बीसी वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जाजूला श्रीनिवास गौड राहतील.