98 निर्वासितांचा मायदेशात जाण्यास नकार

अमेरिकेतून हद्दपार झालेल्या विविध देशांतील 98 अवैध स्थलांतरितांना पनामा देशातील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या मायदेशात परतण्यास नकार दिला आहे. यापैकी कोणालाही हॉटेलबाहेर पडण्यास परवानगी नाही. हॉटेलमध्ये असलेल्या निर्वासितांना मायदेशात जाण्यास नकार दिल्याने कोंडी झाली आहे. जोपर्यंत तिसरा देश त्यांना घेऊन जाण्यासाठी पुढे येत नाही, तोपर्यंत त्यांना तिथेच ठेवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे 98 जण अमेरिकेने पनामाला पाठवलेल्या 299 स्थलांतरितांच्या मोठय़ा गटाचा भाग आहेत. पनामा सिटीमधील हॉटेलमध्ये असलेल्या निर्वासितांवर पोलिसांची देखरेख आहे.