मुंबईतील 291 बेकऱ्या प्रदूषणकारीच

प्रदूषण निर्माण करणाऱया बेकऱयांना पर्यावरणपूरक स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी पालिकेने पाठवलेल्या नोटिशीनंतर 314 बेकऱयांपैकी आतापर्यंत 23 बेकरीचालकांनी त्यांच्या बेकऱया पर्यावरणपूरक इंधनावर रूपांतरित करून घेतल्या आहेत, तर 15 बेकरीचालकांनी बेकऱयांचे रूपांतर करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने प्रदूषण निर्माण झाले असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. काहींवर बांधकामे थांबवण्याची कारवाई पालिकेने केली आहे. त्याचबरोबर प्रदूषण पसरवणाऱया बेकऱया, शेकोटय़ा यावरही पालिकेने लक्ष ठेवले आहे.