किआ प्लांटमधून 900 इंजिन चोरीला

किआ मोटर्सची कार बनवणाऱ्या कारखान्यातून 900 इंजिनची चोरी झालीय. ही धक्कादायक घटना पाच वर्षांनंतर ऑडिट करताना उघडकीस आली. आंध्र प्रदेशातील पेनकोंडा कारखान्यातून पाच वर्षांत 900 इंजिनची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने आता चोरीची तक्रार दाखल केली आहे. 2020 पासून इंजिनची चोरी झाली असून पाच वर्षांत चोरट्याने 900 इंजिन चोरले आहेत. ही चोरी किआ मोटर्सच्या काही माजी कर्मचाऱ्यांसह सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी असावी, असा पोलिसांना संशय आहे. या कारखान्यात दरवर्षी 3 ते 4 लाख गाड्या तयार केल्या जातात.