ऑटो शो भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 ची सांगता झाली. हा ऑटो शो 17 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत सुरू होता. या शोमध्ये देश-विदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांनी 90 हून अधिक वाहनांची लाँचिंग केली, तर या ऑटो शोला जवळपास 9 लाख लोकांनी भेट दिली. लोकांनी भेट देणाऱयांची संख्या अमेरिकेतील डेट्रॉयट ऑटो शोहून अधिक होती. या एक्स्पोमध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी सहभाग घेतला.