चेंबूरमध्ये 9 बांगलादेशी नागरिकांना अटक

आरसीएफ येथील म्हाडा कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या नऊ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना घाटकोपर पोलिसांनी पकडले. त्यात चार पुरुष, चार महिला व एका बालकाचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आठ बांगलादेशी घुसखोर मुंबईत वास्तव्य करीत असून सद्यस्थितीत त्यांचे राहण्याचे ठिकाण आरपीएफ परिसरातील म्हाडा कॉलनीत असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवण्णा ठेंगळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी धडक देऊन बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतले.