84 हिंदू यात्रेकरू संत शदाराम साहिब यांच्या जयंतीनिमित्त पाकिस्तानात दाखल

हिंदुस्थानातील 84 हिंदू यात्रेकरू आज पाकिस्तानात दाखल झाले. ते सिंध प्रांतातील मंदिरात शिवाचे अवतार असलेले सतगुरू संत शदाराम साहिब यांची 316वी जयंती साजरी करण्यासाठी पाकिस्तानला गेले आहेत. वाघा बॉर्डरमार्गे त्यांनी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. युशिष्ठर लाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांना शेजारील देशात नेण्यात आले. यासाठी व्हिसा जारी करणे हे 1974 च्या धार्मिक स्थळांच्या भेटींवर पाकिस्तान-हिंदुस्थान प्रोटोकॉलच्या चौकटीत सामाविष्ट आहे. पाकिस्तानच्या या दौऱयात हिंदुस्थानातील यात्रेकरू योग माता मंदिर अकिलपूर, घोटकी, पणो अकील, सुक्कूर आणि ऐतिहासिक अशा साधू बेला मंदिरासह इतर धार्मिक स्थळांनाही भेट देतील. तसेच ते 14 जानेवारीला शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचे जन्मस्थान नानकाना साहिब येथे एक दिवस घालवतील आणि त्यानंतर दुसऱया दिवशी मायदेशात परततील.