गेल्या पाच वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात, 88 जणांचा मृत्यू; RTI मधून माहिती समोर

गेल्या पाच वर्षात बेस्ट बसचे 834 अपघात झाले आहेत. या अपघातात 88 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना 42.20 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्सप्रेसमध्ये याबाबत वृत्त देण्यात आले आहे. अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागवली होती. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत कंत्राटी आणि बेस्टच्या बसचे 834 अपघात झाले आहेत. त्यात 88 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांच्या नातेवाईकांना 42.40 कोटी रुपये भरपाई म्हणून देण्यात आली आहे.

बेस्टच्या बसचे 352 अपघात झाले असून त्यात 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कंत्राटी पद्धतीवर चालणाऱ्या बसचे 482 अपघात झाले आहेत. त्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. 2002-23 आणि 2023-24 या वर्षात सर्वाधिक म्हणजेच 21 जणांचा बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झाला आहे.

गेल्या पाच वर्षात बेस्ट बसच्या अपघातात जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना 42.20 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. 2022-23 या वर्षात 107 प्रकरणांत सर्वाधिक म्हणजेच 107 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. 201-20 साली 9.55 कोटी, 2020-21 साली 3.44 कोटी, 2021-22 साली 9.45 कोटी तर 2023-24 साली 7.54 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या चालकांवरही बेस्ट प्रशासनाने कारवाई केली आहे. जीवघेण्या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या 12 चालकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ज्या अपघातात लोक जखमी झाले आहेत अशा बेजबाबदार दोन चालकांना काढून टाकण्यात आले आहे.