त्रिपुरामध्ये 828 विद्यार्थी हे एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. त्रिपुरामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अनेक विद्यार्थी देशभरातील विविध संस्थामध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात हे विद्यार्थी एचआयव्ही बाधित आढळले. एड्ससाठी अद्याप कोणताही ठोस उपचार नाहीत.