जम्मू-कश्मीरमध्ये 80 टक्के दहशतवादी पाकिस्तानचे

terrorist

जम्मू आणि कश्मीरमध्ये गेल्या वर्षभरात मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी हे पाकिस्तानचे होते. तसेच सध्या ज्यांच्याशी लढताना लष्कराचे जवान शहीद होत आहेत ते 80 टक्के किंवा त्याहून अधिक दहशतवादी पाकिस्तानचेच आहेत, असा दावा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा सरकारचा दावा खोटा ठरला आहे.