
अॅपलने गेल्या आठवड्यात हिंदुस्थानसह अन्य देशांत नवीन फिचर आणि अॅपल इंटेलिजन्स फिचरच्या सपोर्टसाठी आयओएस 18.4 हे अपडेट जारी केले. यासोबतच आयफोन यूजर्ससाठी 8 नवीन इमोजीसुद्धा रोलआऊट केले. यातील एका थकलेल्या इमोजीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा इमोजी म्हणजे डोळ्यात झोप आलेला इमोजी असून खूपच थकलेला दिसत आहे. त्यामुळे चॅटिंग करताना यूजर्स या इमोजीचा जास्त वापर करू शकतात.