8 कोटीची रोल्स रॉयल्स, 2 कोटीत विकली! कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी हवी, रोहित पवार यांची मागणी

मोतेवारची 8 कोटीची रोल्स रॉयल्स 2 कोटीत विकली. प्रशांत कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत ही मागणी केली आहे.

X वर पोस्ट करत रोहित पवार खणले आहेत की, “सामान्य जनतेची 4700 कोटीहून अधिकची फसवणूक करणाऱ्या मोतेवारची संपत्ती जप्त करून गुंतवणूकदारांना पैसे परत करणे अपेक्षित होते. मोतेवारची 8 कोटीची रोल्स रॉयल्स विकता येणार नाही, अशी सीबीआयची नोटीस असतानाही ती नोटीस मागे घ्यायला लावून गाडीवर बँकेचे कर्ज दाखवून बँकेमार्फत त्या गाडीचा लिलाव घडवून 2 कोटीला ती एका बिल्डरला विकण्यात आली. हे सर्व अशक्यप्राय असणारं काम कोरटकरने आपल्या ओळखी वापरून घडवून आणलं.”

रोहित पवार म्हणाले, “मोतेवारने लाखोमध्ये घेतलेल्या जमिनींची मार्केट व्हॅल्यू कोटींमध्ये झाली असतानाही लिवाव करत असताना अधिकाऱ्यांना कळू न देता त्या जमिनी कोटींमध्ये मार्केट प्राईजला विकल्या, पण कागदोपत्री विक्री मात्र लाखांमध्ये दाखवली गेली. यामध्येही कोरटकरसारख्या दलालांनी मोठी भूमिका बजावली अशी चर्चा आहे.”

ते म्हणाले, “आपल्या मैत्रीची ओळख दाखवत चिल्लर असलेला कोरटकर मागील दहा वर्षात तोडपाणी घडवून आणणारा मोठा दलाल बनला. या दलालावर कारवाई झाल्याशिवाय हजारो लोकांचा पैसा परत मिळणार नाही. त्यामुळं कोरटकरसह मोतेवार प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायलाच हवी.”