Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

पेन्शन घेण्यासाठी 70 वर्षाची वृद्ध महिलेला दोन किलोमीटर पंचायत कार्यालयात चालत जावं लागत आहे. या महिलेचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे ही महिला हळू हळू पंचायतचे कार्यालय गाठत आहे. ओडिशामधली ही घटना असून या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पथुरी देहुरी या 70 वर्षांच्या वृद्ध महिला ओडिशाच्या केंझार जिल्ह्यात राहतात. त्या दिव्यांग असून त्या पेन्शनवर अवलंबून आहेत. पण ही पेन्शन घेण्यासाठी त्यांना दोन किलोमीटर पंचायतच्या ऑफिसमध्ये जावं लागतं. देहुरी यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे त्यांना धड चालताही येत नाही. दोन किलोमीटर चालत चालत त्या पंचायत ऑफिसमध्ये येतात आणि आपली पेन्शन घेतात.

 

पेन्शनधारकाच्या घरी जाऊन त्यांना पेन्शन देण्याचा नियम आहे. तरी देहुरी यांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.