70 हजार कोटी खाणारा बंदर आता पोपट झालाय! विजय वडेट्टीवार यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ  गेला अंदर, असं सांगत होते. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. 70 हजार कोटी खाणारा बारामतीचा बंदर आता पोपट झालाय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

चंद्रपूर येथे श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीर गटाचे नेते अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. 70 हजार कोटी खाल्यानंतर बारामतीचा मीटू आता पोपट झाला आहे. त्यांच्यासारखे भुजबळी आता मिठू मिठू बोलायला लागतील. खासदारांची स्थिती तर गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.