काँग्रेस पक्षाच्या रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकराने राज्यात जातनिहाय जनगणना सुरू केली. आतापर्यंत राज्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त जनगणना पूर्ण झाली आहे, अशी माहिती लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”तेलंगणामध्ये आमच्या सरकारने 70 टक्क्यांपेक्षा जास्त जातनिहाय जनगणना पूर्ण केली आहे. लवकरच सरकारकडे संपूर्ण राज्याचा तपशीलवार डेटा असेल, ज्याचा उपयोग आम्ही धोरणे बनवण्यासाठी आणि सामाजिक न्याय मजबूत करण्यासाठी करू.”
ते म्हणाले के, ”जात जनगणना ही महत्त्वाची पायरी आहे, जी पुढील काही दशकांतील सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यात मदत करेल. त्यामुळे देशात सर्वसमावेशक जात जनगणनेची मागणी मी वारंवार करत आहे. तेलंगणाच्या काँग्रेस सरकारने मार्ग दाखवला आहे, आम्ही राष्ट्रीय स्तरावर व्यापक जात जनगणनाही करू.”
तेलंगाना में हमारी सरकार ने जातिगत गिनती का 70% से ज़्यादा काम पूरा कर लिया है। जल्द ही पूरे राज्य का विस्तृत डेटा सरकार के पास होगा, जिसका इस्तेमाल हम नीतियां बनाने और सामाजिक न्याय को मजबूत करने के लिए करेंगे।
जाति जनगणना उन सभी महत्वपूर्ण कदमों में से पहला कदम है जो अगले कुछ…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2024