Earthquake in Caribbean sea – कॅरिबियन समुद्रात 7.5 तीव्रतेचा भूकंप; मेक्सिको, हैतीसह 12 देशांना त्सुनामीचा इशारा

कॅरिबियन समुद्रामध्ये शनिवारी सायंकाळी शक्तिशाली भूकंप झाला. शनिवारी सायंकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी होंडुरासच्या उत्तरेला 6.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने या भूकंपाचा केंद्रबिंदु जॉर्ज टाऊन केमेन आयलंडपासून 209 किलोमीदर दूर जमिनीखाली 10 किलोमीटर आत असल्याची माहिती दिली. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता 6.89 एवढी होती. शक्तिशाली भूकंपामुळे किनाऱ्यावर उंच लाट्या धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने या भूकंपानंतर त्सुनामीची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. मात्र प्रशांत त्सुनामी चेतावणी केंद्राने शक्तिशाली भूकंपामुळे केमेन बेट, जमैका, क्यूबा, मेक्सिको, होंडुरास, बहामास, बेलीज, हैती, कोस्टारिका, पनामा, निकारागुआ आणि ग्वाटेमालाच्या समुद्रकिनाऱ्यांवर त्सुनामीच्या लाटा धडकू शकतात असा इशारा दिला आहे.