राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत अकरा महिन्यांत एन्फ्लुएन्झामुळे तब्बल 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर या कालावधीत 2335 जणांना लागण झाली. सध्या 11 जण वेगवेगळय़ा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा आणि आवश्यक काळजी घ्यावी.
एन्फ्लुएन्झा हा विषाणुमुळे होणारा आजार आहे. एन्फ्लुएन्झाचे एच1एन1, एच2एन2 आणि एच3एच2 असे उपप्रकार आहेत. यामध्ये ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणि न्युमोनिया आदी लक्षणे आढळतात. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दीर्घकाळ दिसून आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशा आहेत उपाययोजना
- फ्लूसदृश रुग्णांना वर्गिकरणानुसार विलगीकरण कक्ष स्थापन,
- आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध,
- डॉक्टर्सना क्लिनिकल मॅनेजमेंटबाबत आवश्यक पुनर्प्रशिक्षण,
- सर्व जिह्यांना खबरदारीबात सूचना निर्गमित,
- डेथ ऑडिट करण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना
नोव्हेंबरपर्यंतची स्थिती
- एकूण संशयित रुग्ण – 2196455
- ऑसेलमॅटवीर दिलेले संशयित फ्ल्यू रुग्ण – 2335
- एच1एन1 बाधित रुग्णांची संख्या – 2335
- 11 महिन्यांत एकूण मृत्यू – 68