तिरुपती मंदिरात 670 कोटींचे दान

तिरुपति मंदिरात 6 महिन्यात 670 कोटींचे दान जमा झाले आहे. तिरुमाला वेंकन्ना मंदिरात भक्तांकडून येणाऱया दानात दिवसागणिक वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात 116.46 कोटी, फेब्रुवारीत 111.71 कोटी, मार्चमध्ये 118.49 कोटी, एप्रिल मध्ये 101.63 कोटी, मे महिन्यात 108.28 कोटी आणि जुने मध्ये 113.64 कोटी रुपये जमा झाले आहेत.  टीटीडी ने 24 बँक खात्यात जमा झालेली रक्कम आणि सोन्याची माहिती दिली आहे. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत 17,816.15 कोटी रुपये जमा झाले होते.