साईचरणी 648 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण, नाव गुप्त ठेवण्याची साईभक्ताची विनंती

शिर्डीतील साईबाबांवर देश-विदेशातील लाखो लोकांची श्रद्धा आहे. देश-विदेशातील लाखो भाविक येथे दरवर्षी भेट देतात आणि साईचरणी नतमस्तक होऊन त्यांच्या झोळीत भरभरून दान देतात. आज एका साईभक्ताने तब्बल 648 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केला. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीगोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.

साईचरणी अर्पण करण्यात आलेल्या सोनेरी मुकुटाची किंमत 42 लाख 8 हजार रुपये आहे. रविवारी सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला. मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्‍ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.