
सध्या जगभरात एआयची चर्चा सुरू आहे, परंतु हिंदुस्थानातील 60 टक्के लोकांना एआय काय आहे हेच माहिती नाही. गुगल-कांत्राने जारी केलेल्या एका अहवालाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली. स्टडीमध्ये भाग घेणाऱया 60 टक्के लोकांना एआयची माहिती नसून केवळ 31 टक्के यूजर्संनी एआय टूलचा वापर केल्याचे म्हटले आहे. दैनंदिन आयुष्यात एआयचा वापर असावा असे 75 टक्के लोकांना वाटते. या स्टडीमध्ये 18 शहरांतील आठ हजार लोकांनी सहभाग घेतला. या स्टडीमध्ये भाग घेणाऱ्या 72 टक्के लोकांनी प्रोडक्टिविटी वाढवण्यासाठी एआयचा वापर करावा, असे म्हटले.