
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेतर्फे सहा विशेष गाडय़ा चालविल्या जाणार असून रविवार, 28 जुलैला तिकिटांच्या आरक्षणाला सुरुवात होईल.
मुंबई सेंट्रल-ठोकूर (6 फेऱ्या)
3, 10 आणि 17 सप्टेंबर ही विशेष गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरून दुपारी 12 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8.50 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही बुधवारी 4, 11 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ठोकूर येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.05 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड (26 फेऱ्या)
2 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मंगळवार सोडून दररोज दुपारी 12 वाजता ही गाडी मुंबई सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवार वगळता दररोज पहाटे 4.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
वांद्रे-कुडाळ (6 फेऱ्या)
वांद्रे टर्मिनस येथून ही गाडी गुरुवार, 5, 12 आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ येथून 6, 13 आणि 20 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता सुटेल.
अहमदाबाद-कुडाळ (6 फेऱ्या)
ही विशेष गाडी अहमदाबाद येथून मंगळवार, 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुडाळ येथून बुधवार, 4, 11, 18 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.45 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
विश्वामित्री-कुडाळ (6 फेऱ्या)
ही विशेष गाडी विश्वामित्री येथून 2, 9, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुटेल. कुडाळ येथून मंगळवार, 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 4.30 वाजता सुटेल.
अहमदाबाद-मंगळुरू (6 फेऱ्या)
ही विशेष गाडी अहमदाबाद येथून शुक्रवार, 6, 13 आणि 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.45 वाजता मंगुळुरू येथे पोहोचेल. पुन्हा मंगुळुरू येथून शनिवार, 7, 14 आणि 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.10 वाजता सुटेल आणि सोमवारी 2.15 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.