हिरो मोटोकॉर्पच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजीनामा

दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पचे वरिष्ठ अधिकारी मोठय़ा संख्येने कंपनी सोडून जात आहेत. कंपनीतील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामध्ये मुख्य माहिती आणि डिजिटल अधिकारी रीमा जैन, एचआरप्रमुख समीर पांडे, सीबीओ विडाचे स्वदेश श्रीवास्तव आणि धर्म रक्षित या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याआधी हिरो मोटोकॉर्पचे सीईओ निरंजन गुप्ता आणि मुख्य व्यवसाय अधिकारी रणजीवजीत सिंग यांचा समावेश आहे. हिरो मोटोकॉर्प गेल्या 10 वर्षांतील वाईट काळापासून जात आहे. त्यातच हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी कडक धोरण अवलंबिल्याने अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पवन मुंजाल यांच्या कडक धोरणानंतर अनेक अधिकाऱ्यांनी स्वतःहून राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.