
न्यू यॉर्कमधील हडसन नदीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एबीसी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यू यॉर्कमधील हडसन नदीत प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवणारे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात विमानातील सर्व पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात पायलटसह स्पेनमधील एक कुटुंब असल्याची माहिती मिळाली आहे. दोघ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेनंतर मॅनहॅटनपासून नदीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. विपरीत हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. च्या परिस्थितीमुळे त्यांचे स्वतःचे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकले नाही, गुरुवारी न्यू यॉर्कमध्ये दाट ढगांच्या आच्छादनाखाली हवामान उष्ण होते. हेलिकॉप्टर नदीजवळ कोसळत असल्याचे पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
1980 पासून न्यू यॉर्कमध्ये सुमारे 30 हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. हे गेल्या काही महिन्यातली दुसरी घटना आहे, याआधी वॉशिंग्टन डीसी मध्ये विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली होती. त्यामुळे शहरातील हेलिकॉप्टर वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.