गुजरातमध्ये सापडले 575 बांगलादेशी, हरयाणात 460 पाकिस्तानींची होणार चौकशी

जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सरकारने हिंदुस्थानातील पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गुजरातमध्ये 500 पेक्षा अधिक बांग्लादेशी सापडले आहेत. या बांगलादेशींकडे वैध कागदपत्र न सापडल्यास त्यांना मायदेशी परत पाठवले जाईल.

गुजरातच्या अहमदाबाद आणि सूरतमध्ये 575 बांगलादेशी पकडण्यात आले आहेत. तर हरयाणातही 460 पाकिस्तानी नागरिकांना परत मायदेशी पाठवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. हरयाणातील असलेले पाकिस्तानी हे बहुतांशी हिंदू आहेत, पण त्यांना ताब्यात घेण्याबद्दल कुठल्याही सूचना नाहीत. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाकडे नियोजन मागितले आहे.

 

गुजरात पोलिसांनी अहमदाबाद आणि सूरतमध्ये छापे घातले आणि परदेशी नागरिंकाविरोधात मोहीम राबवली. एकट्या अहमदाबाद शहरात 457 तर सूरतमध्ये 100 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले आहे. पकडलेल्या सर्व नागरिकांची रस्त्यावरच परेड काढण्यात आली आणि त्यांना पोलीस स्थानकात आणण्यात आलं.