लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकारने खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरला. ही घटना आज उघडकीस आली असून मानकापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. त्याने खून केल्याची कबुली दिली असून बुधवारी पुरलेला मृतदेह काढण्यात येणार आहे. महेश वळसकर (57,) असे आरोपी प्रियकराचे, तर प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक (24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
प्रिया गेल्या सहा वर्षांपासून फरस, गोधनी येथे कुटुंबापासून वेगळी राहत होती. ती गेल्या 16 तारखेपासून अचानक बेपत्ता झाली.