अमृतसरमध्ये 561 ग्रॅम हेरॉइनसह 17.6 लाख जप्त

पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांनी दोन हवाला ऑपरेटर्सना अटक केली आहे. सुखजीत सिंग आणि रणबीर सिंग अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 561 ग्रॅम हेरॉइनसह 17.6 लाखांची कॅश रोकड आणि 4 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. सुखजीत सिंग आणि रणबीर सिंग हे ड्रग्ज तस्करांना केवळ आर्थिक मदत करत नव्हते तर हवालाद्वारे हे व्यवहार लपवण्याचा प्रयत्नदेखील करत होते.