
राज्यभरातील तब्बल 21 जिल्हा रुग्णालयांमध्ये 56 टक्के खाटांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न बालरोग, स्त्राrरोग आणि प्रसूती रुग्णालयांतही गंभीर अवस्था असून 25 पैकी 8 रुग्णालयांत खाटांची कमतरता असल्याची धक्कदायक माहिती क@गने सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनाच्या केलेल्या लेखापरिक्षण अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना परवडत नसतानाही खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे.
भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या खाटांची एकूण संख्या ही जिह्याची लोकसंख्या, प्रतिवर्ष खाटांचे दिवस आणि बेड ऑक्युपेन्सी रेट म्हणजेच खाटा व्याप्ती दर यावर आधारित असते. तसेच प्रत्येक जिल्हा रुग्णालयात दर 10 लाख लोकसंख्येमागे 220 खाटांची गरज आहे. मात्र, लेखा परिक्षणात गंभीर बाबी समोर आल्या. 21 जिल्हा रुग्णालयांपैकी 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये मंजूर खाटा या भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार नव्हत्या.
2011 च्या तुलनेत गंभीर स्थिती
2011 च्या जनगणनेच्या तुलनेत मे 2023 पर्यंत राज्यातील 21 रुग्णालयांमध्ये 7 हजार 833 खाटांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. 16 जिल्हा रुग्णालयांमध्ये माता व बालसंगोपन सेवांसाठी खाटांची कमतरता होती. समूह आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आंतर-रुग्ण सेवा प्रादन करणे आणि अनुक्रमे 30 तसेच सहा खाटा असणे गरजेचे आहे. परंतु, 17 समूह आरोग्य केंद्रांमध्ये 30 खाटांची सुविधा होती. तर 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सात आरोग्य केंद्रांमध्ये खाटांची उपलब्धथ सहाहूनही कमी असल्याचे निदर्शनास आले.