एकीकडे लग्नांमध्ये पैशांचा पूर येत असताना पुणे शहरातील अनेक जोडप्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ला पसंती दिली आहे. यंदा वर्षभरात 5 हजार 500 जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकली.
कायदेशीर पद्धतीने ठराविक पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत कमी खर्चात कोर्ट मॅरेजला पसंती दिली जात आहे. लग्नासाठी नोंदणी करण्याचे कार्यालय पुणे स्टेशन परिसरात आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 अन्वये विवाह नोंदणी केली जाते त्याची नोंद होते. विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. अर्ज केल्यानंतर 4 दिवसांत त्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर नोटीस पाठविण्यात येते. नोटीसचा कालावधी एक महिन्याचा असतो. पक्षकार हे तारीख ठरवून रजिस्टर करू शकतात. त्यांना लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिले जाते, असे या कार्यालयाने सांगितले.