पॅरासिटामॉल, पॅन डी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी3 सप्लिमेंट्स, मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणाची औषधे अशी एकूण 53 औषधे सेंट्रल ड्रग स्टँडड्र्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) योग्य दर्जाची नसल्याचे जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यापैकी बहुतेक औषधे मोठ्या प्रमाणावर ओव्हर द काऊंटर म्हणजे प्रिस्क्रीप्शनविना विकली जात असतात. सीडीएससीओच्या ताज्या मासिक यादीत अँटिबायोटिक क्लॅव्हम 625 आणि पॅन डी ‘बनावट’ जाहीर केली गेली आहेत.
कुठली औषधे झाली नापास
व्हिटॅमिन सी आणि डी3 टॅब्लेट शेलकॅल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल्स, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामॉल 500, एमजी, पोटाच्या संसर्गावरील मेट्रोनिडाझोल, वेदनाशामक डायक्लोफेनाक, श्वसन रोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या अँब्रोक्सोल, फंगलविरोधी फ्लुकोनाझोल, मधुमेहविरोधी ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबावरील टेलमिसार्टन गोळ्यांसह सर्वाधिक विकली जाणारी अशी ही 53 गोळ्या-औषधे आहेत.
या कंपन्यांची औषधे झाली फेल
हेटेरो ड्रग्ज, अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्थान अँटीबायोटीक्स लि, कर्नाटक अँटीबायोटीक्स अँड फार्मास्युटीकल्स लि, मेग लाईफसायन्सेस, प्युअर अँड क्यूअर हेल्थकेअर आणि अन्य कंपन्यांकडून या औषधांचे उत्पादन होते.