जनसेवेसाठी ‘सरकार आपल्या दारी’ अशा योजना आणल्याचा टेंभा मिरवणाऱ्या ‘मिंधे’ सरकारच्या कारभारात सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याचा प्रकार मंत्रालयात आज पुन्हा एकदा घडला. बोरिवलीत छोटासा व्यवसाय करून संसार हाकणाऱया एका वृद्धाने पालिका अधिकारी प्रचंड त्रास देत असल्यामुळे ‘न्याया’साठी मंत्रालयाच्या अक्षरशः पायऱया झिजवल्या. मात्र तिथे त्यांच्या तक्रारीकडे पुणी ढुंकूनही पाहत नसल्यामुळे संताप व्यक्त करीत आज त्यांनी थेट पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांना व्रेनच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
बोरिवली येथे राहणारे अरविंद बंगेरा (52) असे या अन्यायग्रस्त वृद्धाचे नाव आहे. बंगेरा बोरिवलीत वडापाव विक्रीचा छोटा व्यवसाय करतात. मात्र मुंबई महानगरपालिकेचा एक अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना त्रास देत आहे. प्रचंड त्रासल्याने त्यांनी थेट मंत्रालयात न्यायासाठी धाव घेतली. न्यायासाठी त्यांनी पाचव्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालयांत मोठी पायपीट केली. मात्र त्यांच्याकडे पुणी ढुंकूनही पहायला तयार नाही. त्यामुळे संतापलेल्या बंगेरा यांनी अखेर संबंधित अधिकाऱयाने आपले जगणं मुश्कील केल्याचे सांगत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
थरार, पळापळ आणि सुटका
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन आणि मंत्रालय परिसरात नागरिकांची मोठी रेलचेल सुरू आहे. अनेकजण आपल्या कामासाठी या ठिकाणी येतात. अशाच प्रकारे आज बंगेरा हेदेखील मंत्रालयात आले होते. मात्र आपल्याला पुणीच न्याय देत नसल्याच्या संतापातून त्यांनी पाचव्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावर उडी घेत आत्महत्या करण्याची चेतावणी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मंत्रालयात सर्वच यंत्रणांची प्रचंड पळापळ झाली. अखेर पोलिसांनी बंगेरा यांची समजूत काढत क्रेनच्या सहाय्याने त्यांना सुरक्षितरीत्या खाली उतरवले.
जाळ्यांमुळे टळतोय अनर्थ
सर्वसामान्यांना मंत्रालयात न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या पाचव्या मजल्यावरून संतप्त अन्याग्रस्त थेट खाली उडी मारण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मंत्रालय इमारतीच्या मधल्या भागात सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उडी मारणारे अन्याग्रस्त या जाळ्यांवर अडकल्याने अनर्थ टळत आहे.