महाराष्ट्रातली दलदल साफ करणार, रोहित पवारांचा निर्धार

 

निवडणूक काळात गेल्या 24 तासांत 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे गुजरात स्टाईलचे मनसुबे असून महाराष्ट्राची जनता ही दलदल साफ करणार असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, गेल्या दोन-अडीच वर्षात ५० हजार कोटीहून अधिकची दलाली खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या दलालीच्या पैशाचा धुवांधार पाऊस राज्यात पडत असल्याने सर्वत्र पैशांचा महापूर आलाय.. गेल्या दोनच दिवसात ५२ कोटीहून अधिकची रोकड जप्त झाली.

दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेऊ, असं सरकारला वाटत असलं तरी महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता मात्र गुजरात स्टाईलचे हे मनसुबे उधळल्याशिवाय आणि दलालांनी करून ठेवलेली दलदल साफ केल्याशिवाय राहणार नाही असेही रोहित पवार म्हणाले.