म्हाडा कोकण मंडळ सोडत, खासगी विकासकांकडून मिळालेल्या घरांवर अर्जदारांच्या उड्या

कोकण मंडळाच्या सोडतीत खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 20 टक्के योजनेतील घरांना अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील 1301 घरांसाठी आतापर्यंत 5090 अर्ज आले असून 4067 जणांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे.

म्हाडाने कोकण मंडळाच्या घरांसाठी 10 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यात 11 हजार 187 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 1301 घरे ठाणे, वसई, कल्याण येथील विविध लोकेशनवर आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना त्या त्या योजनेतील घरे उपलब्ध असेपर्यंतच कार्यरत राहणार आहे. अर्जदारांनी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून इच्छित सदनिकेसाठी अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरतेवेळी अर्जदारांना केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करावे लागणार आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक व पासपोर्ट साईज पह्टो ऑनलाइन सादर करावयाचा आहे