
कर्नाटकात एका घरात खुप साऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. पोलिसांना खबर मिळाली होती. पोलिसांनी जेव्हा इथे छापा मारला तेव्हा त्यांना हे घबाड सापडलं.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकाच्या कन्नाडा जिल्ह्यात पोलिसांनी खुप साऱ्या 500 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. पण या नोटा प्रथमदर्शनी खोट्या वाटत आहेत. या नोटांवर कुठेही रिझर्व्ह बँकेचे सील नाही. त्यावर गव्हर्नरची सही नाही, सिरीयल नंबर नाही. इतकंच नाही तर या नोटांवर चित्रपटाच्या शुटिंगसाठी अशी सूचना लिहिली आहे.
या नोटांवर कुठलाही सिरीयल नंबर नाही असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या नोटा खोट्या आहेत असे म्हणता येणार नाही. तसेच नोटांच्या एका बाजूला चित्रपटासाठी शुटिंगसाठी असे नमूद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घरात एक माणूस भाड्याने राहता होता.चौकशीसाठी पोलिसांनी या भाडेकरूला ताब्यात घेतले आहे.