यमुनेच्या स्वच्छतेसाठी 500 कोटी

यमुना ही आपली आई, आपली देवता आणि आपला सांस्कृतिक वारसा आहे, असे सांगत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. यमुनेसाठी 500 कोटी रुपये खर्चाचे 40 विपेंद्रीकृत सांडपाणी प्रकल्प असतील. जेणेकरून कोणत्याही घाणेरडय़ा गटाराचे पाणी यमुना नदीत पडणार नाही. दिल्लीतील सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढवेल, असे रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या.

स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ यमुना ही दिल्लीची नवी ओळख बनेल. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळेल. तसेच दिल्लीत स्वच्छता पुरवणे हे आमचे प्राधान्य आहे. यासाठी 9 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. हे मागील सरकारांपेक्षा तिप्पट आहे, असे रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी 50 हजार अतिरिक्त पॅमेरे बसवले जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सायन्स ऑफ लिविंग कार्यक्रम आहे, मुलांना योग आणि ध्यानाशी जोडले जाईल. यासाठी दीड कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. शिक्षणातील सुधारणांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 100 शाळांमध्ये प्रयोगशाळा उघडल्या जातील, सर्व भाषा शिकवल्या जातील. यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.