
जम्मू खोऱयात झालेले दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची शक्यता लक्षात घेता लष्कराने पूर्ण ताकद जम्मू खोऱयात पणाला लावली आहे. याआधीच निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर पोलीस दल याव्यतिरिक्त लष्कराचे तीन हजारांपेक्षा जास्त जवान हे युद्धपातळीवर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. तसेच लष्कराने आता जवळपास 500 पॅरा कमांडो हे जम्मू खोऱयात उतरवले आहेत़ पॅरा कमांडो हे लष्कराचे एक विशेष अंग म्हणून ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विशेष मोहिमा, कामगिरी हे या पॅरा कमांडोंवर सोपवल्या जातात.
ड्रोनद्वारे ड्रग्जची तस्करी
पाकिस्तानी सीमेलगतच्या गावात दहशतवादी ड्रोनद्वारे ड्रग्जची तस्करी करतात. यातून जो पैसा मिळतो त्याचा वापर ते दहशतवादी कारवायासाठी करतात. वेगवेगळय़ा मोहिमेतून 6 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे.
जवानांच्या काही तुकडय़ा डोडात
दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी या परिसरात दोन हजार जवानांना पाठवण्यात आले आहे. या ठिकाणच्या जंगलातील कानाकोपऱयात कसून शोध घेतला जात आहे.
6 हजारांसाठी दहशतवाद्यांना आश्रय
तीन दहशतवाद्यांनी नागरिकाच्या घरी आश्रय घेतला होता. यासाठी दहशतवाद्यांनी 6 हजार रुपये दिले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.