दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कद्दर परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी पकडले जाऊ नये या भितीनं गोळीबार सुरू केला. यावेळी प्रत्त्युतरादाखल सुरक्षादलाच्या जवानांनी देखील गोळीबार केला. या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.
दरम्यान, चकमक थांबली असली तर शोध मोहीम सुरू असून आणखी दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.