जम्मू-काश्मीरमध्ये भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जम्मू-काश्मीर गुरुवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. येथे 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. मात्र यात कोणतीही किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी 4.19 वाजता भूकंपाची नोंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. कंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये 36.49 अंश उत्तर अक्षांश आणि 71.27 अंश पूर्व रेखांशावर 165 किलोमीटर खोलीवर होता, असं एक अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, याआधी 13 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये 5.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळीही सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता.सकाळी 10.43 च्या सुमारास हा धक्का जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भिवंडीतही जाणवले भूकंपाचे धक्के

भिवंडीतही दोन दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले होते. त्यावेळी भिवंडीचे तहसीलदार अभिजित कोल्हे यांनी माहिती देताना संगितले होते की, यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. अभिजित कोल्हे यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के काही सेकंदच तालुक्याच्या विविध भागात जाणवले.