49 टक्के करदात्यांनी आयटीआर भरला नाही…

करदात्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करणे अनिवार्य आहे. डेडलाईन जवळ येतेय तशी करदात्यांची धावपळ सुरू झालीय. टॅक्स फायलिंग पोर्टलवर झुंबड उडालीय. तांत्रिक अडचणींमुळे आयटीआर फाईल करताना अडचणी येताहेत. परिणामी अद्याप निम्म्या करदात्यांनी आयटीआर फाईल केलेले नाही. ‘लोकलसर्कल’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 49 टक्के करदात्यांनी आयटीआर भरलेला नाही. 33 टक्के लोकांनी फायलिंग प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे सांगितले. 31 जुलैची डेडलाईन गाठणे अशक्य असल्याचे 11 टक्के लोकांनी सांगितले. 16 टक्के करदाते आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी धडपडत आहेत. 14 टक्के करदात्यांच्या चार्टड अकाऊंटटनी आरटीआय भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले. दरम्यान आरटीआय फायलिंगची डेडलाईन वाढवण्याची मागणी होत आहे.

n आयटी रिटर्नची डेडलाईन जवळ आल्याने टॅक्स फायलिंग पोर्टलवर लोड वाढला आहे. लॉगिन फेल्युअर, अनरिस्पॉन्सिव पेजेस तसेच मोठी फाईल अपलोड करताना अडचणी येत आहेत.